ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मराठा

नेवासा | संदिप दरंदले अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाची नेवासा येथे आज पहिली मीटिंग नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष अनिल ताके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेवासा तालुका अध्यक्ष भरत पाटील बेल्हेकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.यावेळी श्रीरामपूर येथील उच्चशिक्षित उमेदवार इंजिनियर किरण जाधव यांनी कुणबी मराठा महासंघाच्या बैठकीला उपस्थित राहून प्रस्थापित उमेदवारा विरोधात आपल्याला संधी दिली तर आपण मराठा कुणबी आरक्षण व शिर्डी लोकसभेचा विकासाबाबत प्रश्न संसदेत मांडू असे सांगून मराठा कुणबी महासंघाने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी केली.

सविस्तर असे कि अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या कार्यकारणीची पहिली मीटिंग नेवासा येथे संपन्न झाली. यावेळी मराठा कुणबी महासंघाचे नेवासा तालुका अध्यक्ष भरत बेल्हेकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना तालुक्यातील प्रत्येक गावात व जिल्हा परिषद गटा मध्ये संघटना बांधणार असल्याचे म्हणाले. तसेच मराठा कुणबी संघटनेचे ध्येयधोरणे समाज बांधव समोर मांडणार आहे. तसेच मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर भाषणात आपले मत मांडले.यावेळी शिर्डी लोकसभा उमेदवार निवडीबाबत चर्चा झाली.याबाबत कुणबी मराठा महासंघाचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष अनिल ताके पाटील यांनी शिर्डी येथे उमेदवार देण्याबाबत सहा तालुक्यातील समन्वयक व इच्छुक उमेदवाराची बैठक लवकर घेणार असल्याचे ते म्हणाले.कुणबी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष बद्रीनाथ चिंधे पाटील यांनी संघटना वाढी बाबत अतिशय मौलिक विचार मांडले.

कुणबी मराठा महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख संदिप दरंदले पाटील यांनी मराठा समाजाचे जो उमेदवार आरक्षणाबाबत प्रश्न सोडवणार आहे आणि जो उमेदवार समाजाला मान्य असेल त्याला पाठिंबा समाजाने द्यावा असे भाषणात मांडले.यावेळी जेष्ठ विचारवंत कवी एस. बी शेटे यांनी संघटन एकजुटीचे व मजबुतीबाबत नवनियुक्त पदाधिकारी यांना अतिशय चांगले मार्गदर्शन केले.समाजाच्या प्रश्नाबाबत नेहमी बरोबर राहणार असल्याचे सांगितले. तसे सक्षम वडार संघटनेचे अध्यक्ष संदिप कुसळकर यांनी कुणबी मराठा महासंघाला आरक्षण प्रश्नबाबत आमचा नेहमी पाठिंबा राहील असे जाहीर केले.यावेळी मराठा सेवा पतसंस्था संचालक संभाजीराव मते पाटील नेवासा महिला आघाडी अध्यक्ष नीलिमाताई वाबळे पाटील, नेवासा शहर अध्यक्ष जयश्रीताई शिंदे,लीलाताई मारकळी,उषाताई मारकळी, उज्वलाताई गवळी आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

मराठा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मराठा
मराठा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मराठा
Share the Post:
error: Content is protected !!