ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुण्यतिथी

नेवासा – नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र  देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने  पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दि.२ एप्रिल ते दि. ६ एप्रिल कालावधीत होणार असून या निमित्ताने महाविष्णू याग,अखंड हरिनाम सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी पारायण व रात्री कीर्तन महोत्सव सोहळा साजरा होणार आहे.

श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य  श्री भास्करगिरीजी  महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व  उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मिती फाल्गुन वद्य अष्टमी मंगळवार दि.२ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने पहाटे मंगल सनई वादन,४.३० ते ६.३० काकडा भजन व श्रींची आरती,सकाळी ६.३० ते ७.३० दर्शन प्रदक्षिणा,७.३० ते ८.३० गीतापाठ विष्णू सहस्त्रनाम, ८.३० ते ११.३० श्री ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२.३० ते १.३० भोजन,१.३० ते ३.०० समयानुसार आलेल्या गुणवंतांचे कार्यक्रम, दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५.३० ते ७.०० हरिपाठ व श्रींची सायंम आरती दर्शन, रात्री ७.०० ते ८.३० भोजन तर रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन,त्यानंतर रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत नेमलेल्या ग्रामस्थांचा जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.

रात्री ८.३० ते १०.३०या वेळेत  होणाऱ्या कीर्तन महोत्सवात मंगळवार  दि.२ एप्रिल रोजी हभप तुकाराम बुवा महाराज श्री संत सखाराम महाराज संस्थान एलोरा, बुधवार दि.३ एप्रिल रोजी हभप पैठण येथील सतीश महाराज घाडगे,गुरुवार दि.४ एप्रिल रोजी आकोट येथील जिल्हा न्यायाधीश हभप चकोर महाराज बाविस्कर,शुक्र वार दि.५ एप्रिल रोजी देविदास महाराज म्हसके हिंगणगाव यांचे हरि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी दि.६ एप्रिल रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सकाळी ८ ते १० यावेळेत होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची सांगता होणार आहे.पंचदिनात्मक पुण्यतिथीच्या निमित्ताने होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायणाचा व रात्री होणाऱ्या कीर्तन महोत्सवातील कीर्तन श्रवणाचा तसेच दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुण्यतिथी
Share the Post:
error: Content is protected !!