ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ईस्टर

नेवासा – घोडेगांव (ता.नेवासा) येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत तसेच अतिशय धार्मिक वातावरणात ख्रिस्ती धर्मप्रमुख रेव्ह फा.सतिश कदम यांच्या शुभहस्ते ईस्टर पवित्र मिस्सा साजरा करण्यात आला यावेळी प्रवचनकार रेव्ह फा.विलसन रुमाओ यांनी ईस्टरचा संदेश देतांना सांगितले की, प्रभू येशूचे तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठणे म्हणजेच ख्रिस्ती धर्माचा उगम आहे. प्रभू येशूने मारणावर विजय मिळवीला आणि स्वर्गराज्य आपल्यासाठी उघडे केले,

जर आपण प्रभुवर विश्वास ठेऊन जीवन जगले,प्रभुने जसे अखिल मानवजातीच्या तारणासाठी व कल्यानासाठी स्वतःला झोकून दिले तसेच आपण जर केले तर आपण सुद्धा मृत्यूवर विजय मिळवून स्वर्गात जाऊ शकतो मृत्यू म्हणजे नर्क, आज प्रत्येक जण मरणाला घाबरतो,खरा विश्वासू घाबरत नाही तर बिनधास्त लढतो नरकाच्या शक्तीशी आज जगाला खरे उपासक पाहिजे ढोंगी नको. सत्य तुम्हाला मुक्त करील म्हणून सत्यानेच जीवन जगा नाहीतर असत्य जीवन तुम्हाला नरकाचा मार्ग दाखविल.
सर्वांचे आभार मनात प्रमुख धर्मगुरु फा.सतीश फिलिप कदम यांनी सर्वांना नियमित पवित्र मिस्साला या आणि अध्यात्मिक जीवन जगत राहा तरच स्वर्गराज्य आहे असे आव्हान केले.

ईस्टर
ईस्टर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ईस्टर
ईस्टर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ईस्टर
Share the Post:
error: Content is protected !!