ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दारू

गणेशवाडी – सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदा शिवारातील घोडेगाव रोडवर असलेल्या हॉटेल आकाश व हॉटेल सह्याद्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ४५ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. याबाबत पोलीस मिळालेल्या कडून माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजेंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदा गावच्या शिवारात चांदा ते घोडेगाव रोडवर असलेल्या हॉटेल आकाश मध्ये विनापरवाना बेकायदा देशी विदेशी चोरून विक्री करण्याच्या स्वतःच्या कब्जात मिळून आल्याने आकाश बाळासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२४भा द वी कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बाळासाहेब गायकवाड यांच्या ताब्यातून १८०२० किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या याप्रकरणी अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करीत आहेत तर दुसरा छापा यात शिवारातील चांदा ते घोडेगाव रोडवर असलेल्या हॉटेल सह्याद्रीवर छापा मारला असता राजेंद्र बापूराव जावळे हा विनापरवाना देशी विदेशी दारू विकताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल पोपटराव कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात जावळे यांच्याविरुद्ध गु र न १५२/२०२४ भा द वी कलम ६५ ई गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदा शिवारातील हॉटेल आकाश व सह्याद्री वरील छाप्यात ४५ हजाराची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आलेली आहे याप्रकरणी अधिक तपास दोन्ही पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता गावडे अधिक तपास करीत आहे .

दारू
दारू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारू
दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारू
Share the Post:
error: Content is protected !!