ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सावित्रीबाई फुले

भेंडा – येथील जिजामाता शास्र व कला महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विजय अडसुरे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी पदवी प्रदान केली. त्यांनी इंगजी साहित्यातील नामवंत भारतीय लेखक मुल्क राज आनंद व आर. के. नारायण यांच्या लघु कथांचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावर पुणे विद्यापीठास प्रबंध सदर केला होता. या संशोधन कार्यात प्रा. अडसुरे यांना सोनई येथील आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मच्छिंद्र वर्पे तसेच अहमदनगर कॉलेज चे प्रा.डॉ. पराग आठवले व प्रा. डॉ. कमलाकर भट यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. डॉ. विजय अडसुरे यांनी आतापर्यंत इंग्रजी साहित्य व भाषा या विषयावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपर सादर केले आहेत. या यशाबद्दल प्रा. डॉ. अडसुरे यांचे श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष- माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील , संस्थेचे सचिव श्री अनिल शेवाळे, सहसचिव श्री रविंद्र मोटे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांनी अभिनंदन केले आहे.

newasa news online
सावित्रीबाई फुले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सावित्रीबाई फुले
Share the Post:
error: Content is protected !!