ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चोर

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मंगल कार्यालयात मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि.३० मार्च रोजी घोडेगाव येथील तुकाई मंगल कार्यालयातून भाऊसाहेब मुरलीधर हापसे रा. दत्तनगर सोनई यांचे मालकीची एम एच १७ बि. जि ४३९३ क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली त्यांचे फिर्यादी वरुन गुन्हा .रजि .नं. व कलम १५०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोना नानासाहेब तुपे हे करत आहेत.

तर दुसरी घटना सोनई येथील गायत्री मंगल कार्यालय येथुन दि. २९ मार्च रोजी किरण बाबासाहेब सावंत रा. शनिशिंगणापूर यांच्या मालकीची एम एच १२ एच एच ९८५० क्रमांकाची दुचाकी चोरीस गेल्याची घडली. फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा रजि नं. व कलम १४९/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ. के. बी. राख हे करत आहेत.

चोर
चोर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोर
चोर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोर
Share the Post:
error: Content is protected !!