ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

किसनगिरी बाबा

नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयास मंगळवारी दि.२ एप्रिल रोजी  भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.पुण्यतिथी निमित्ताने सदगुरू किसनगिरी बाबा की जय अशा जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती यावेळी दिवसभरात १२५ दिंड्यांनी देवगड येथे हजेरी लावली.
त्यांचे स्वागत देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी तसेच देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशांनदगिरीजी महाराज यांनी केले.

पाच दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने मंगळवारी दि.२ एप्रिल रोजी सकाळी वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबांच्या मूर्तीस देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण होऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करून पारायणाचा शुभारंभ करण्यात आला.तर यज्ञ मंडपात पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने तीन दिवशीय महाविष्णू याग सेवेकरी करजगाव येथील उमाकांत कंक व जयाताई कंक या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजेने करण्यात आली.यावेळी झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न भेंडा येथील पुरोहित गणेशदेवा कुलकर्णी, शरदगुरू काटकर, कांतागुरू जोशी, स्वानंद जोशी यांच्यासह ब्रम्हवृंद मंडळींनी केले.

या सोहळयाचे औचित्य साधून  महंत कैलासगिरी महाराज,महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, आ.शंकरराव गडाख व माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगड येथे भेट देऊन भगवान दत्तात्रय व किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने सकाळ पासून ते सायंकाळी उशिरापर्यंत  अनेक गावातील दिंड्यांनी “ओम नमो सदगुरू जय जय किसनगिरी बाबा”असा जयघोष करत मंदिर प्रांगणात हजेरी लावली. मराठवाडयातील संभाजीनगर, गंगापूर, पैठण तालुक्यातील विविध भागातून ही दिंड्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.दुपारच्या सत्रात हजारो भाविकांच्या उपस्थितीत महंत भास्करगिरी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय व सद्गुरू किसनगिरी बाबांची महाआरती करण्यात आली तर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महंत भास्करगिरी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळयाची सांगता होणार आहे. देवगड दत्त पिठाचे निर्माते सदगुरू किसनगिरीजी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने प्रथमच शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावल्याने देवगड परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.केलेल्या आवाहनानुसार सर्व भक्त परिवाराने गावागावातून दिंड्या आणल्याने श्री समर्थ सदगुरु किसनगिरीजी बाबांच्या भक्त परिवाराच्या भक्तीचे मोठे दर्शन घडले.

किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किसनगिरी बाबा
Share the Post:
error: Content is protected !!