ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गोवंश

नेवासा – बजरंग दल, देवा ग्रुप फाउंडेशनच्या गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे भेंडा येथे गोवंश मांस वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात नेवासा पोलिसांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार २ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास नेवासा तालुका बजरंग दल, देवा ग्रुप फाउंडेशनच्या गोरक्षकांना श्रीरामपूरहून बीडकडे जाणारा एक ट्रक गोवंश मांस घेऊन भेंड्याकडे येत असल्याची खबर मिळाली.

गोरक्षकांनी तत्परता दाखवत भेंडा येथे कारखाना ऊस ट्रॅक्टर गटाजवळ त्या आयशर कंपनीच्या ट्रकला अडवून तपासणी केली असता ट्रक (एमएच ०४ ईबी ९९४९) मध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे अंदाजे ५ टन मांस आढळून आले.गोरक्षकांनी डायल ११२ या क्रमांकावर कॉल केला त्यानंतर कुकाणा दूरक्षेत्र येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक, ट्रकमधील गोवंश जातीच्या जनावरांचे मांस व चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

newasa news online
गोवंश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोवंश
गोवंश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोवंश
Share the Post:
error: Content is protected !!