ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हिंदू

नेवासा – हिंदू समाजातील शक्तीच्या जोरावर हिंदू राष्ट्र टिकून आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. विश्व हिंदू परिषद अहिल्यानगर विभाग बैठक नेवासा येथे संपन्न झाली.श्री. समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा पुण्यतिथि निमित्त विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी बाबाजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज व महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांची भेट घेवुन आशीर्वाद घेतले. त्यावेळी संस्थानच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.

मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे की, हिंदू मंदिरांच्या कामकाजात प्रत्येक जाती आणि समुदायाने सहभाग घेतला पाहिजे.विहिंपच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. विहिंप संघटनेच्या विस्तारासोबत सामाजिक समरसता आणि सेवेच्या कामावर भर देणार आहे. जन्माष्टमीपर्यंत आपले कार्य एक लाख ठिकाणी नेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. बजरंग दलाची शौर्य जागरण यात्रा आणि राम मंदिर गृह संपर्क अभियान यामुळे संघटनेचा विस्तार होण्यास मदत झाली आहे.

हिंदू मंदिरे हिंदू समाजानेच चालवली पाहिजेत. मिलिंद परांडे म्हणाले की, तामिळनाडू राज्यात 20,000 पुजारी प्रशिक्षण व भारतात पहिल्यांदा महिला पुजारी प्रशिक्षण नुकतेच महाराष्ट्रात संपन्न झाले. सध्या आमचे देशात सेवाकार्य 5000 ठिकाणी सुरू आहे.प्रभू राम आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढत राहिले. त्यांनी जनजागृती केली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत प्रत्येकामध्ये असली पाहिजे.

विहिंपचे परांडे म्हणाले की, प्रभू रामाच्या जीवनात सामाजिक समरसता आहे. ते आदिवासी भागात आणि वनवासी समाजात गेले. त्यांनी प्रत्येक जाती, समाजातील लोकांना आपल्या हृदयात घेतले. हा हिंदूंचा दृष्टिकोन आहे. त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. रामजींचे कर्तव्य जीवन कठोर होते. त्याच्या आयुष्यात कोणताही चमत्कार नाही. माणसाने आपले जीवन कसे जगावे याचा आदर्श त्यांनी मांडला.

यावेळी संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, प्रांत विश्वस्त प्रभाकर शिंदे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, प्रखंड मंत्री प्रशांत बहिरट जिल्हा मंत्री श्रीकांत नळकांडे, सहमंत्री विशाल वाकचौरे, कुणाल भंडारी अविनाश काळे विश्वनाथ नानेकर गजेन्द्र सोनावणे आदींची उपस्थिती होती.

newasa news online
हिंदू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हिंदू
हिंदू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हिंदू
Share the Post:
error: Content is protected !!