ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बाळासाहेब पवार

भालगाव – वाढलेल्या महागाईवर व शेत मालाच्या भावावर एकही नेता बोलायला तयार नाही त्यामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत चांगला माणूस निवडून देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा येथील युवा शेतकरी बाळासाहेब पवार यांनी केले आहे.यावेळी बोलताना युवा शेतकरी बाळासाहेब पवार म्हणाले की आजच्या कलियुगात खूप गोड बोलणारी,अति नम्रता दाखवणारी,पाया पडणारी,अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक व आतल्या गाठीची,लबाड,बेरकी,संधी साधू व विश्वासघातकी असतात.तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात.

या उलट,जी माणसं तोंडावर रागाने,कडवट, टीकात्मक,जहरी,फटकळ पण स्पष्ट बोलतात,त्यांच अंतर्मन वरच्या प्रवृत्ती पेक्षा नक्कीच चांगल असतं, विश्वासघात करणं,फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं.ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा ना शिको पण माणसं ओळखायला, कमवायला,वाचवायला नक्की शिकलच पाहिजे.कारण आत्ता सध्याच्या काळात स्वतःच्या फायद्यासाठी प्रामाणिक, सरळ,सर्वसामान्यांचा वापर करणारी खूप बांडगुळ तयार झालेले आहेत.

आता परत निवडणुकीचे वारे चालू झाले आहेत. सध्याच्या काळात शेती व शेतकरी विषयक कितीतरी प्रश्न अधांतरी आहेत. शेती व शेतमालाच्या भावावर व वाढलेल्या महागाईवर बोलायला एकही नेता किंवा लोकशाहीचा तिसरा स्तंभ मीडिया हा पण लक्ष द्यायला तयार नाही.तेव्हा विचार करा आणि चांगला माणूस निवडून देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन बाळासाहेब पवार यांनी केले आहे.

बाळासाहेब पवार
बाळासाहेब पवार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाळासाहेब पवार
बाळासाहेब पवार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाळासाहेब पवार
Share the Post:
error: Content is protected !!