ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पत्रकार

नेवासा – लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या मानाच्या अहिल्यादेवीनगर जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी सोनई येथील पत्रकार संदिप दरंदले यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांच्या आदेशानुसार सोनई येथील पत्रकार संदिप दरंदले पाटील यांची एक वर्षा साठी निवड करण्यात आली आहे.संदिप दरंदले हे गेली पंधरा वर्षांपासून विविध राष्ट्रीय व स्थानिक दैनिकात पत्रकारिता करत आहेत.जिल्हातील पत्रकारांचे संघटन करून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्या साठी काम करणे. पत्रकार पेन्शन योजने बाबत काम करणे. पत्रकार हल्लाविरोधी कायदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे. पत्रकार अधिस्वीकृती साठी काम करणे आदी बाबी मध्ये लोकशाही जिल्हा पत्रकार संघ जिल्ह्यात काम करणार असल्याचे लोकशाही पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष संदिप दरंदले म्हणाले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव व भगिनी यांनी याबाबत पत्रकार संदिप दरंदले यांच्याशी 9850594609 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दरंदले यांनी केले आहे.या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

newasa news online
पत्रकार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पत्रकार
पत्रकार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पत्रकार
Share the Post:
error: Content is protected !!