ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिक्षक

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या समर्थ सदगुरु किसनगिरीबाबा विद्यालय उ दुमालाचे प्राचार्य संभाजी आरगडे यांचा सेवापूर्ती समारंभ मुळा एज्युकेशन सोसा उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना युवा नेते उदयन गडाख म्हणाले शिक्षक नोकरी करत असतांना समाज उभारणीचे काम करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम शिक्षक बांधव अखंड करत असतात. प्राचार्य संभाजी आरगडे यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत विद्यार्थी व शाळा यांचा मेळ घालून काम करणारे प्राचार्य संभाजी आरगडे शिक्षक हे संस्थेच्या व विद्यालयाच्या
प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असायचे आरगडे यांना आरोग्यमय वाटचालीस युवा नेते उदयन गडाख यांनी शुभेच्छा दिल्या.

सेवापूर्ती बद्दल प्राचार्य संभाजी आरगडे यांचा उदयन गडाख यांनी सपत्नीक संस्थेच्या वतीने सत्कार केला. संस्थेच्या वतीने सचिव उत्तमराव लोंढे यांनी आरगडे यांना सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डॉ संजय कळमकर,कॉ बाबा आरगडे,सरपंच किशोर सुकाळकर,प्रशासनधीकारी डॉ आशोक तुवर, राजेंद्र गायकवाड,राजेंद्र सानप,सरपंच शरद आरगडे आदींसह विद्यार्थी, शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्ती निमित्त प्राचार्य संभाजी आरगडे यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.

शिक्षक
शिक्षक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिक्षक
शिक्षक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिक्षक
Share the Post:
error: Content is protected !!