ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अहमदनगर

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला एक सहकाराची आदर्श परंपरा लाभलेली आहे. परंतु काही लोक याला काळिमा फसवण्याचे काम करत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील काही बँक व पतसंस्था यांमधील गैरप्रकार सर्वांसमोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे २ कोटी रुपयांची रक्कम परस्पर दुसर्‍या सावकाराच्या खात्यात वर्ग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या पतसंस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल झालाय.अहमदनगर जिल्ह्यातील एका नावाजलेल्या तालुक्यातील या संस्थेच्या शाखेत मे २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची तक्रार कर्जदारांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.३) दुपारी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे २ कोटी रुपयांची रक्कम परस्पर दुसर्‍या सावकाराच्या खात्यात वर्ग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या पतसंस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एका नावाजलेल्या तालुक्यातील या संस्थेच्या शाखेत मे २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकाराची तक्रार कर्जदारांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.३) दुपारी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तक्रारदार (नाव गुपित) यांच्यासह अन्य ११ जणांनी शिरूर येथील एका सावकाराकडून ४ टक्के व्याज दराने सुमारे २ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते. ते फेडण्यासाठी त्या सर्वांनी संबंधित पतसंस्थेच्या शाखेत कर्ज प्रस्ताव सादर केले. त्यासाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सर्वांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले.

मात्र त्याची रक्कम कर्जदारांना न देता पतसंस्थेचे चेअरमन यांनी कर्जाची २ कोटी रुपयांची रक्कम तिऱ्हाहीत खात्यावर वर्ग करत या कर्जदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी पतसंस्थेचे चेअरमन आदींसह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अहमदनगर
अहमदनगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अहमदनगर
Share the Post:
error: Content is protected !!