ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हल्ला

नेवासा – दारू पिण्यासाठी एक हजार रूपये दिले नाही म्हणून युवकाला शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत घडली. शुभम राजेंद्र क्षीरसागर (वय २३ रा. हंडी निमगाव ता. नेवासा) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश घोरपडे, मोंट्या व अक्षय (पूर्ण नावे माहिती नाहीत, सर्व रा. कायनेटीक चौक, नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सध्या कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत रूमवर राहण्यास असून ते रांजणगाव (जि. पुणे) एमआयडीसीत खासगी नोकरी करतात. ते दररोज नगर ते पुणे खासगी बसने ये- जा करत असतात. बुधवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजता ते त्यांच्या रूमवर असताना त्यांच्या ओळखीचे आदेश घोरपडे, मोंट्या व अक्षय तेथे आले त्यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले असता मोंट्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आदेश घोरपडे
याने लोखंडी कोयत्याने हल्ला करून जखमी केले. तसेच अक्षय याने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी फिर्यादी व त्यांचा मित्र दत्ता कडूस यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

newasa news online
हल्ला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हल्ला
हल्ला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हल्ला
Share the Post:
error: Content is protected !!