ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

एकादशी

नेवासा – आज एकादशीच्या निमित्ताने देवगड देवस्थान येथे दत्त भगवंतांच्या मूर्तीला फळांची आरास करण्यात आली असून दत्त भगवंताचे मनमोहक रूप सकाळच्या वेळी पहावयास मिळाले. दत्त भगवंताच्या मूर्तीला पहाटेच्या वेळी दूध ,दह्याने अभिषेक करण्यात आला त्या नंतर आंबा ,केळी, संत्रा, मोसंबी, द्राक्ष ,अननस ,चिकू ,पपई आदी फळांनी दत्तात्रय भगवंताच्या मूर्ती सजवली गेली होती. पहाटेच्या वेळी काकडा ,तदनंतर भजन करण्यात आले . सकाळी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज महंत उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. तसेच यावेळी देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी मंत्र पुष्पांजली म्हटले.

यावेळी काकड आरती ,भजन, तसेच कार्तिक भगवंताच्या मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये आरती करण्यात आली तद नंतर किसनगिरी बाबांच्या समाधीची आरती करण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त , देवस्थानचे विद्यार्थी, सेवेकरी, परिसरातील महिला भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर देवगड देवस्थान येथे देवगड येथील बँड पथकाने ढोल, सनई ,चौघडे, वाजवले गेले त्यात सर्व देवी, देवतांच्या आरत्या म्हटल्या भक्ती गीते म्हटले गेले त्यामुळे संपूर्ण देवगड परिसर मंत्र मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,बाळू महाराज कानडे , तात्यासाहेब शिंदे,तसेच परिसरातील टाळकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकादशी
एकादशी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकादशी
एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकादशी
Share the Post:
error: Content is protected !!