ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

Ahmednagar News : उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन नातवाने आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत्याला तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे नुकतीच ही घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला रामभाऊ जाधव (वय ७५) या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द, ता. राहुरी येथे त्यांचा मुलगा व मोठा नातू युवराज यांच्यासह राहतात. त्यांच्या शेजारीच दुसरा मुलगा त्याच्या कुटुंबासह राहतो. (दि.१) एप्रिल रोजी ४ वाजेच्या दरम्यान शकुंतला जाधव या घरी असताना शेजारी राहणारा त्यांचा नातू प्रितम सुनिल जाधव हा आला आणि म्हणाला की,

तुझ्या मुलीला सांग की, मी दिलेले उसणे पैशे मला परत दे, असे म्हणून तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा शकुंतला जाधव त्याला म्हणाल्या की, तु शिविगाळ करु नको, असे म्हणाल्याचा प्रितम यास राग आल्याने त्याने शकुंतला यांना धकाबुक्की केली.त्यावेळी शकुंतला यांचा मोठा मुलगा राजकुमार रामभाऊ जाधव हे भांडण मिटविण्यास आले असता, आरोपी प्रितम याने त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या घरात जावून तलवार घेवून आला व राजकुमार यांना

तलवारीने तुकडे करुन मारुन टाकतो, अशी धमकी दिली आहे. शकुंतला रामभाऊ जाधव यांच्या फिर्यादीवरून त्यांचा नातू आरोपी प्रीतम सुनिल जाधव याच्यावर मारहाण, धमकी तसेच आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
Share the Post:
error: Content is protected !!