ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मृतदेह

काळीज हेलवणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका युवकाचा विचित्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६) असे या युवकाचे नाव आहे. घातपात करून मारल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

अधिक माहिती अशी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून दिलीप सोनवणे हा युवक बेपत्ता झाला होता. या बेपत्ता युवकाचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दिलीप भाऊसाहेब सोनवणे असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिसाना समजली. बुधवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी ही घटना उघडकीस आली असून या मृत युवकाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता.

दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस
ही घटना कधी घडली, मृतदेह कुणी कसा फांद्यांनी झाकून ठेवला याची कुणाला कल्पनाही नव्हती. मात्र जेव्हा या मृतदेहाची दुर्गंधी सुटली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला व घटना उघडकीस आली. सकाळी गावातील व्यक्ती या परिसरात आलेली होती तेव्हा त्यास दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने आसपास पाहणी केली. तेव्हा त्याला परिसरातच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्याखाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह दिसल्याने ही घटना उघडकीस आली.

मृतदेह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृतदेह
मृतदेह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृतदेह
Share the Post:
error: Content is protected !!