ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

नेवासा – भारतीय जनता पार्टीच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त नेवासा शहर भाजपचे युवा नेते मनोज पारखे यांच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक येथुन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठलराव लंघे पाटील व जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पेचे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीची सुरवात करण्यात आली ही रॅली नेवासा फाटा येथुन सुरू होऊन शहरातील संभाजीनगर, अहिल्यानगर, कॉलेज परिसर, मध्यमेश्वरनगर, विवेकानंदनगर, शिवाजीनगर, गंगानगर, लोखंडे गल्ली, जुनी पेठ मार्गे नगरपंचायत चौक येथे संपन्न झाली नेवासा शहरातील सर्व प्रभागांमध्ये बाईक रॅलीचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

नगरपंचायत चौक येथे जेष्ठ भाजपा कार्यकर्ते खंडाळे सर व भास्कर कणगरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अजीत नरुला, राजेंद्र मुथा, ज्ञानेश्वर पेचे, मनोज पारखे, शिवसेनेचे वाखुरे भाऊसाहेब यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, भाजपा प्रदेश संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, राजेश कडू, अजितसिंग नरुला, रितेश कराळे, विलास बोरुडे, रामेश्वर गाडेकर, रामभाऊ लष्करे, बापु शिरसाठ, निलेश शेंडे, भास्कर कनगरे, कृष्णा डहाळे, अनंता डहाळे, आदिनाथ पटारे, ज्ञानेश्वर जाधव, व्यापारी शहराध्यक्ष राजेंद्र मुथा,

श्रीकांत पारखे, शिवाजी लष्करे, शशीकांत पारखे, महेश आरले, सुशांत पारखे, नानासाहेब शेंडे, राजु शिरसाठ, करण पोटफोडे, महेश पारखे, आकाश कुसळकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल भाजपा नेते मनोज पारखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

newasa news online
भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप
Share the Post:
error: Content is protected !!