ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

काड

नेवासा – तालुक्यातील अनेक ठिकाणी या पंधरा दिवसात गव्हाची मोठ्या प्रमाणात काढणी चालू आहे लवकर च्या गव्हापेक्षा उशिरा पेरणी केलेल्या गव्हाच्या उत्पादनात योग्य वाढ झाल्याचे आढळून येत आहे बहुतांशी शेतकरी गव्हाची सोंगणी हार्वेस्टर मशीनच्या साह्याने करत आहेत त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचा काड शिल्लक राहतो आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे.

त्यासाठी जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ गाडले पाहिजेत त्यामुळे गव्हाचा काड हे सोन्यासारखे महत्त्वाचे आहे कारण जमिनीची ती भूक आहे व त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते जमीन भुसभुशीत होते जमिनीत हवा खेळती राहते जमिनीचा निचरा सुधारतो व विशेषतः जमिनीतील जिवाणूंना अन्न मिळते या सर्व फायद्यासाठी जमिनीमध्ये गव्हाचा काड गाढवा तो जळू नये गव्हाचा काड जाळल्यामुळे जमिनीचे तापमान वाढते जमीन घट्ट होते व जिवाणू मरतात हे सर्व तोटे होतात तेव्हा शेतकरी बंधूंनी गव्हाचा काड जाळू नये असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली आहे.

काड
काड

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

काड
काड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

काड
Share the Post:
error: Content is protected !!