गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री गजानन महाराज विजय पारायण सेवा भावी संस्था यांचे वतीने सालाबादप्रमाणे या ही वर्षी जालना येथील गजानन महाराज पारखीस मोदक वाटपाचा कार्यक्रम झाला.
अवघ्या महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी, वारीचा श्वास म्हणजे वारकरी वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्त्व आहे. त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात.
श्री गजानन महाराज वारी पालखी मध्ये हजारो वारकरी सहभागी होत असतात. यातील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी घोडेगाव येथील या सेवा भावी संस्थेला मिळत असतो. संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना मोदक, खडीसाखर, बिस्किटे वाटपाचे काम करण्यात आले. या वेळी यमुना इंगळे, गिता गुजर, ज्योती काकडे, आश्विनी पाटील, रेखा इंगळे, सुवर्णा खंदाडे,उपस्थित होत्या. दरवर्षी आपल्या हातून अशीच सेवा घडो अशी आशा सेवा भावी संस्थेचे धनंजय मोहन काळे व उपाध्यक्ष शुभांगी दिपक रुद्रे यांनी व्यक्त केली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.