ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चिवटे

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जगाला जेथून ज्ञानेश्वरी सांगितली अशा श्री क्षेत्र नेवासा येथील “पैस खांब” भव्य वारकरी उत्सवास महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख गोरगरीब रुग्णांचे आधारवड आरोग्य दूत मा.श्री.मंगेशजी चिवटे साहेब यांनी उपस्थित राहून ज्ञानदेवता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या खांबाला टेकून अखंड विश्वाला ज्ञानेश्वरी सांगितली अशा पैस खांबाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी श्री क्षेत्र नेवासा पंचक्रोशीतील व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला उत्तम-निरोगी आरोग्य लाभावे यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांचा सत्कार करत दर्शन घेतले.

समस्त नेवासा ग्रामस्थांच्या वतीने डॉ. करण घुले, सचिन काळे, डॉ. भारत कर्डक, प्रभाकर शिंदे, ऋषिकेश शेटे, ज्ञानेश्वर पेचे, सुरेश डिके, बाबा कांगुणे, के एच वाखुरे, भाऊसाहेब वाघ, आदिनाथ पटारे, मनोज पारखे, निरंजन डहाळे, गणेश लंघे, सुरज शेटे, भाऊसाहेब दारकुंडे, रोडे आदींनी फटाक्यांच्या आतषबाजीत पुष्पहार-शाल-बुकेंनी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेशजी चिवटे साहेब यांचे जंगी स्वागत केले.


श्री क्षेत्र नेवासा पैस खांब भव्य वारकरी उत्सव निमित्त समर्पण फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, छाती-दमा, खोकला, टीबी मोफत एक्स-रे तपासणी शिबिरास मा.श्री.मंगेशजी चिवटे साहेब यांनी उपस्थित राहून निरोगी आरोग्यविषयक बहुमोल संदेश दिला.
बांधकाम कामगारांसाठी फिरते दवाखाना ॲम्बुलन्स सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मा.श्री.मंगेशजी चिवटे साहेब उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी रुग्णांना अर्थसहाय्य मिळण्याची व हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया संपूर्णतः नि:शुल्क/मोफत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच, कक्षाकडून आत्तापर्यंत ३०० कोटी निधी वितरित करण्यात आला असून, ४० हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करण्यात आली असल्याचे सांगितले.

चिवटे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना विषयी माहिती देत योजनांचा लाभ मिळणे विषयक बहुमोल मार्गदर्शनही केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, लाडकी बहीण योजना व महायुती सरकार च्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागा पर्यंत पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त करत, या योजना तळागाळापर्यंत पोहचवून सर्वसामान्य गरजूवंतांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अहमदनगर उत्तर जिल्हाप्रमुख सचिन काळे यांनी विशेष कार्य केल्याबद्दल गुरुने शिष्याचे भरभरून कौतुक केले. तसेच, या योजनांचा अधिकाधिक गोरगरीब गरजूंना लाभ मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या.

श्री.सचिन काळे यांनी आपले गुरुवर्य मंगेशजी चिवटे साहेब हेच या महान कार्याचे खरे मानकरी आहेत असे व्यक्त करत, त्यांनी आपल्या गुरुचा यावेळ गुरु सत्कार केला. या कार्यक्रम प्रसंगी, फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. भारत कर्डक यांनी आरोग्यदूत मंगेशजी चिवटे साहेब यांचा परिचय देत, मंगेशजींनी केलेल्या सुलभ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रणाली चे व त्यांच्या रुग्णसेवा कार्याचे भरभरून कौतुक केले. समर्पण फाउंडेशन चे कार्य बांधकाम मजुरांसाठी अत्यंत कौतुकास्पद असून, डॉ.करण घुले जायकवाडी खोऱ्यातील जनतेसाठी बहुमोल कार्य करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. करण सिंग घुले यांनी नेवासा तालुक्यात एकही हॉस्पिटल MJPJY च्या पॅनलवर नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असल्याची खंत मा.श्री मंगेशजी यांच्याकडे व्यक्त केली.

यावर, तालुक्यातील योजना नियमात बसणारे हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पॅनलवर नि:शुल्क तात्काळ घेण्यात येतील, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नियमात बसणाऱ्या हॉस्पिटलला MJPJY पॅनल वर घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. बांधकाम कामगारांसाठी आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधायुक्त सुसज्ज ॲम्बुलन्स चे लोकार्पण मा.श्री.मंगेशजी चिवटे साहेब यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. बांधकाम कामगारांना भांडे सेट चे वाटप, हेल्थ कार्ड, शिष्यवृत्ती धनादेश चे वितरण यावेळी श्री. मंगेशजी चिवटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, नेवासा तालुक्यातील साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पॅनलवर घेतल्याचे पत्रही यावेळी डॉ.त्रिभुवन व डॉ.गणेश लंघे यांना मंगेशजी यांच्या हस्ते देण्यात आले.

चिवटे

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात तर प्रमुख पाहुणे डॉ. भारत करडक, युवराज काकडे, दीपक पाटणे हे होते. यावेळी समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.करण घुले, शिवसेना वैद्यकीय अहिल्यानगर (उत्तर) जिल्हा प्रमुख सचिन काळे, पंचगंगा सिड्स चे प्रमुख प्रभाकर शिंदे, गणेश लंघे, डॉ. अभिजीत त्रिभुवन, सुरेश डिके, बाबा कांगुणे, भाऊसाहेब वाघ, अँड. के एच वाखुरे, ज्ञानेश्वर पेचे, ऋषिकेश शेटे, आदिनाथ पटारे, सुरज शेटे, प्रताप कोंघे, प्रताप चिंधे, संग्राम पाटील, रामेश्वर गाडेकर, दिपक देशमुख, तुषार भुसारी, भाऊसाहेब दारकुंडे, रणछोडदास जाधव, सुनील मोरे, मनोज पारखे, निरंजन डहाळे, शिवसेना वैद्यकीय सहाय्यक अशोक साळुंके, देवा कडू, अमोल शेरे, सुधाकर शेंडे, राजू शेठ कीर्तने, तपासणी ते उपचार योजनेचे अनंत पवार, डॉ. घोगरे, गोविंद नरसाळे,अरुण पवार, सचिन दुसिंग, जिल्हा क्षयरोग चे श्री राजू बोर्डे व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते. सूत्र संचलन रणछोडदास जाधव, प्रास्ताविक डॉ. करण घुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन काळे यांनी केले.

newasa news online
चिवटे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चिवटे
चिवटे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चिवटे