गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बाजार मध्ये खिडकीचे गज कापुन चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ३ जुलै रोजी मध्यरात्री २.४३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मुळा बाजारच्या आॅफिस मध्ये घुसुन वरील मजल्यावरील खिडकीचे गज कापुन आॅफिस मधील कपाटांची उचक पाचक करून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेल्या तिजोरी जवळ आॅफिस च्या वेगवेगळ्या चाव्या पडलेल्या दिसल्या. मुळा बाजार चे मॅनेजर ओमकार आप्पासाहेब दरंदले रा. सोनई यांनी सोनई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र नं. ३४०/२०२४ बिएनएस चे ३३१(४), ३०५( A) , ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. आर. लबडे हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.