उपाध्यक्षपदी निकम व सचिव भुसारी
नेवासा – राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी –
नामदेव शिंदे , तर उपाध्यक्षपदी दादासाहेब निकम यांची नेवासा येथे नुकतीच निवड करण्यात आली. राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नेवासा आढावा बैठकीत तालुक्याची नूतन कार्यकारिणी सोमनाथ कचरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष आदिनाथ म्हस्के, सचिवपदी अशोक भुसारी ,सरचिटणीस अशोकराव डहाळे सरचिटणीस संतोष टेमक,सह सरचिटणीस बाळासाहेब पंडित, देविदास चौरे, खजिनदार – विजय खंडागळे,सह- खजिनदार श्रीनिवास रक्ताटे,संपर्क प्रमुख पवन गरुड,संघटक रमेश शिंदे,प्रसिद्धी प्रमुख विकास बोर्डे मार्गदर्शक – अशोक पेहरकर, सतीश उदावंत, राजेंद्र लाटे, विठ्ठल उदावंत, नवाब शहा, सुरेश दरकुंडे, राजेंद्र दरकुंडे, संतोष सोनवणे,काका नरवणे,
कार्यकारिणी सदस्य – संभाजी शिंदे, मंगेश निकम, रवींद्र शेटे, मोहन शेगर, सत्तार शेख, धीरज देशमुख,यांच्या निवडी करण्यात येऊन नेवासा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अशी माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.
या वेळी नूतन पदाधिकारी यांचे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या, तालुक्यातील नुकताच अपघातात मयत झालेले पत्रकार अमोल मांडणं यांना यावेळी परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मावळते अध्यक्ष सोमनाथ कचरे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने त्यांचा सत्कार जिल्हा मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे यांनी केला, नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे प्रास्तविक जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक पेहरकर यांनी केले आभार रमेश शिंदे यांनी मानले.
नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, सरचिटणीस रोहित टेके,दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.