नेवासा – तालुक्यातील नेवासा बु.येथे गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक ०४/०८/२०२४ रोजी ५ वा.चे सुमारास पोसई मनोज अहिरे यांना त्यांचे गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, नेवासा. बु. येथील सत्तार शौकत इनामदार याचे राहते घरासमोर मोकळया जागेत काही गांजाची झाडे आहेत अशी खात्रीलायक गोपणीय माहिती मिळाल्याने पोसई अहिरे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांना माहिती दिली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री धनजंय जाधव यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील यांना कळवुन त्यांनी आदेश दिल्यावरुन लागलीच दोन लायक पंचाना बोलावुन अधिनस्त असलेले पोसई मनोज अहिरे, पोसई भोंबे, पोहेकॉ राठोड, पोकॉ हरि धायतडक, पोकों आप्पासाहेब वैदय, चालक पोकों / भवर असे सरकारी वाहनाने वजनकाटा घेवुन मिळालेल्या बातमीच्या आशयाने रवाना झाले व बातमीतील इसम नामे सत्तार शौकत इनामदार रा नेवासा बु ता नेवासा याचे राहते घरासमोर पोहचलो त्यावेळी घरासमोर बसलेल्या इसमास पंचासमक्ष त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सत्तार शौकत इनामदार रा नेवासा बु ता नेवासा असे सांगितले त्यास नमुद कायदयान्वये नोटीस देवुन
त्याचे घराशेजारीच असलेल्या मोकळया जागेची / शेतजमीनीची झडती घेण्याची पंचासमक्ष परवानगी घेवुन झडती घेतली असता सदर शेतामध्ये सुमारे ४ ते ५ फुट उंचीचे गांजाची झाडे दिसुन आले ते दोन पंचासमक्ष उपटुन त्याचे सोईनुसार त्याची मुळी बांधुन वजन करुन एकुण ६ कि लो वजनाची गांजाची झाडे किंमत एकुण ६०,००००/- रु ते पंचासमक्ष जप्त करण्यात आली असुन सदर बाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं ७४२/२०२४ एन.डी.पी.एस. कायदा कलम २० (अ), २० (ब), ८ (सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे सत्तार शौकत इनामदार रा नेवासा बु ता नेवासा यास अटक करण्यात आली आहे सदर गुन्हयांचा पुढील अधिकचा तपास पोसई अहिरे हे करित आहेत.
आपल्या परिसरामध्ये कोणी अफु, गांजाची शेती पिकवीत असल्यास याबाबतची माहिती नेवासा पोलीस ठाणे अथवा मला फोन करून कळवावी माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल-पो.नि.धनंजय जाधव
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.