नेवासा – शहरामध्ये सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असुन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार निवेदने देऊनही यावर कारवाई होत नसल्याने नेवासा नगरपंचायत मध्ये साप सोडणार असल्याचा इशारा भाजपचे युवा नेते मनोज पारखे यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नेवासा शहरातील मुख्य बाजारपेठ, श्री ज्ञानेश्वर मंदिर रोड, लोखंडे गल्ली, विवेकानंद नगर, फाटा रोड, मोहिनीराज मंदिर परिसर इ. ठिकाणी असंख्य मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे यामध्ये गाया, गाढवे, कुत्रे यांचा समावेश आहे अनेकदा ही जनावरे रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध बसलेली असतात
त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होवून शाळकरी मुले, महिला, दर्शनासाठी आलेले भाविक, बाजारपेठेतील ग्राहक यांना धोका निर्माण झाला आहे याआधी मोकाट जनावरांमुळे शहरातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे बऱ्याचदा अपघातामुळे ही जनावरेही मृत्युमुखी अथवा जखमी होतात तरी नेवासा नगरपंचायत या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व यातील बहुतांश गाया या खाजगी लोकांच्या असुन अडथळा आणल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे युवा नेते मनोजआण्णा पारखे केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.