नेवासा – नेवासा बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालयात जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या पथकाने नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेल्या विविध कलाकृतींचे कौतुक केले.
आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत विद्यालयामध्ये अचानक जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊराव वीर व टीमने प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांनी मातीच्या चिखलापासून बनविलेल्या कलाकृतींचे कौतुक केले व स्वतः मातीच्या चिखलापासून एक प्रतिकृती विद्यार्थ्यांना तयार करून दाखवली. तसेच सामूहिक कवायतीचा आनंद घेतला. मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक व स्वागत करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वीर म्हणाले की, शालेय परीक्षेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी इतर अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊन आपल्यामधील सुप्त कलागुणांना वाव द्यावा. यावरच आपले पुढील भविष्य अवलंबून आहे. व्यायाम शाळा व स्वच्छतागृहाचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे सादर करण्याचे सुतोवाच केले. सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पर्यंत तीन पदके मिळाली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचाही वाटा आहे असे नमूद करत त्यामुळे कुणीही स्वतःला कमी समजू नये. तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिक्षक अशोक शेंडगे, अरुण चौधरी, गंगाधर गारुळे, मनीषा मते, श्रीमती कोकणे, श्रीमती रूपनर, ज्ञानदेव बारामते, शिवाजी गपाट, सुनील गायकवाड, अशोक शेजुळ, श्री. पवार आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.