ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – तालुक्याचा विकास पुन्हा साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून होणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. मुकिंदपूर येथे घोंगडी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सोमवारी सकाळी माजी उपसरपंच प्रकाश निपुंगे यांच्या वस्तीवर कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार गडाख म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून आपण नेहमीच राजकारणातून समाजकारणाचा वसा घेऊन विकास कामाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष दिलेले असून प्रत्येक गावात दोन गट असले तरी सर्वांना आपण बरोबर घेत सामान वागणूक देऊन कार्यकर्त्यांना मोठी ताकद देण्याचे काम केलेले आहे. निवडणुका येतात आणि जातात मात्र माझी नेहमीच जनतेशी सौजन्याची वागणूक राहिलेली आहे. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.

याप्रसंगी माजी सरपंच प्रकाश निपुंगे, माजी उपसरपंच अशोक उपळकर, पिचडगावचे सरपंच पोपट हजारे, मुळा कारखान्याचे संचालक सोपान पंडित, भाऊसाहेब निपुंगे, बजरंग निमसे, नितीन निपुंगे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, प्रा. अविनाश साळवे, प्रविण साळवे, भाऊसाहेब निपुंगे, ज्ञानेश्वर देवकाते, दिगंबर निपुंगे, रमेश सावंत, पी. आर. जाधव, नारायण लष्करे, भगवानराव शेजूळ, उत्तम इंगळे, बाबा साळवे, कैलास लष्करे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार गडाख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी आमच्या गावात दोन गट असले तरी तुमच्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार असल्याचे आश्वासन दिले. गावाच्यावतीने आमदार गडाख यांचा सत्कार करण्यात आला.

गडाख
newasa news online
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख