अहमदनगर जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत ही घटना घडली आहे.
अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेतील विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने ही चिमुरडी सुखरुप आहे. तिच्या सुटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिलं होतं. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात, पाय आणि तोंड बांधून ठेवले. साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुलीला सोडवतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.