ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

साईबाबा
साईबाबा

नेवासा – नेवासा येथील युवकांनी काढलेल्या साई पालखी दिंडीचे साईबाबांचा नामघोष करत मंगळवारी दि.६ ऑगस्ट रोजी शिर्डीकडे प्रस्थान झाले. साई पायी पालखी दिंडीचे हे चौथे वर्षे असून या दिंडीत युवक महिलांसह सुमारे दीडशे भाविक सहभागी झाले होते. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून मंगळवारी साई बाबांची आरतीने साई दिंडीस प्रारंभ करण्यात आला.दिंडी चालक बाळासाहेब बेळे, नगरसेवक दिनेश व्यवहारे,सामाजिक कार्यकर्ते राजू कडू यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करण्यात आले.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,महिला भाविकांच्या वतीने कु.आरती दीपक व्यवहारे,नगरसेवक दिनेश व्यवहारे यांनी पालखी दिंडीला शुभेच्छा दिल्या.

साईबाबा

यावेळी पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पालखीमध्ये साईबाबांची आकर्षक मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.सदरची पालखी संत तुकाराम महाराज मंदिर,लोखंडे गल्ली,डॉ.हेडगेवार चौक,मारुती चौक,ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथे दर्शनासाठी गेली नेवासा शहरात साई पायी पालखी दिंडीचे फटाक्यांची आतषबाजीने स्वागत करण्यात आले. चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या साई पालखी दिंडीचे नेतृत्व  बाळासाहेब बेळे,उमेश बनकर,आकाश घोडेकर गोकुळ जाधव,समर्थ दीपक व्यवहारे,प्रसाद व्यवहारे. प्रथमेश व्यवहारे,राजू कडू,अण्णा जाधव,संदीप बेळे, योगेश मुरकुटे,स्वप्निल कडपे,प्रमोद पानसरे,प्रतीक वाघुले
हे युवक मंडळी करत आहे.

साईबाबा
साईबाबा
साईबाबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

साईबाबा
साईबाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

साईबाबा