गणेशवाडी – शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांना जाहीर झाला असून ११ ऑगस्ट २०२४ ला शिर्डी येथे हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे सचिव ताईसाहेब वाघमारे यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांनी गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत काम करत आहेत. या काळात त्यांनी वेगवेगळ्या विषयावर सडेतोड व निर्भिड लिखाण करुन तालुक्यासह ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडली आहे.
त्यांच्या या निर्भिड पत्रकारितेमुळे या वर्षीचा राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे शिर्डी तालुका राहता येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्काराबद्दल नेवासा तालुका एकता पत्रकार संघाने अध्यक्ष बाळासाहेब पुरोहित,सुकदेव फुलारी प्रसाद देशपांडे शिवाजी पालवे,कारभारी गरड, प्रसाद देशपांडे, सुहास पठाडे,अनिल गर्जे, रावसाहेब मरकड,गणेश धाडगे, बन्सी एडके गणेश बेल्हेकर अदि पत्रकारांनी अभिनंदन केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.