ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेत

नेवासा – तालुक्यातील गावांमधील शेत रस्ते, शिवरस्तेव शिव पानंद रस्ते केसेस प्रकरण मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत प्रलंबित रस्ता केसेस प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे अहमदनगर जिल्हा शिरस्ते व शेत्र श्री शिव पालन रस्ते समस्या निवारण संघटना शेतकरी विकास परिषदेचे अध्यक्ष व व शेत रस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरद राव पवळे यांचे व उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे सुरेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे पेरू आंदोलन केले होते पेरू आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

शेत

या आंदोलनाची वेळी माननीय श्री सिद्धाराम सालीमठ साहेब जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी शेत व शिव रस्ते या प्रकरणाबाबत वैयक्तिक लक्ष घालतो त्वरित उपविभागीय प्रांत अधिकारी यांची बैठक लावून सर्व तालुक्यातील तहसीलदाराकडून क्षेत्र रस्ते समस्या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची सूचना देतो असे आश्वासित करून दिनांक 23 डिसेंबर 2000 पासून महाराजस्व अभियान राबविण्याचे परिपत्रकही काढले व तारखेनुसार कार्यक्रम जाहीर केला परंतु या महाराजस्व अभियानाच्या परिपत्रकाचा नेवासा तालुक्यातील तहसीलदार यांनी कोणताही प्रकारचा पाठपुरावा न करता महाराजस्व अभियानाचा पूर्णपणे बोजवारा उडविला असून या परिपत्रकाला केराची टोपी दाखवली असे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे श्री नाथाभाऊ शिंदे यांनी नाशिक विभागीय उपयुक्त नाशिक भा.प.से. श्रीयुत प्रवीण गेडाम साहेब यांचे कडे नेवासा तालुक्यातील शेत व शिवरस्ते पेंडिंग केसेस संदर्भात त्वरित निपटारा करण्यासाठी तहसीलदारांना आदेश आदेश करावेत असे निवेदन नुकतेच नाशिक येथे दिले आहे समवेत श्री बबन नारायण शिंदे सगाजी शंकर ऐनर इत्यादी उपस्थित होते त्यावेळी सुरेगाव बेलपांढरी शिव रस्ता 2008 पासून अतिक्रमण मुक्त करण्याचे प्रकरण प्रलंबित आहे तसे धनगरवाडी तामसवाडी शिव रस्ता प्रकरण बलंबित आहे नेवासा बुद्रुक येथील बहिरवाडी नेवासा बुद्रुक शिवरस्ता 2017 पासून अतिक्रममुक्त करणे आहे व इतरही काही शिव रस्ते व शेत रस्ते प्रकरणी प्रलंबित आहे याबाबत श्री प्रवीण गेडाम साहेब यांच्याशी समक्ष चर्चा झाली असून यांनी या प्रकरणाबाबत लक्ष घालून तहसीलदारांना त्वरित आदेश देतो असे आश्वासित केले.

शेत
newasa news online
शेत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेत
शेत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेत