नेवासा – 67 वर्षांपासून हे वखार महामंडळ सातत्याने नफ्यात असलेले वखार महामंडळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून नेहेमीच अग्रेसर राहिले असल्याचे प्रतिपादन भारतीय कपास निगम लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचे उपमहा प्रबंधक श्री स्वप्निल दडमल
यांनी केले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा 67 वा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कपास निगम लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचे उपमहा प्रबंधक श्री स्वप्निल दडमल ते बोलत होते, यावेळी भारतीय कपास निगम चे श्री तिवारी तसेच भारतीय खाद्य निगम चे श्री महेश लाड ,श्री राकेश रंजन तर कृषी पणन महामंडळाचे श्री वाघ हे प्रमुख उपस्थित होते.
वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री एम डी थोपटे, यांनी उपस्थितांचे स्वागत केले संगणक प्रोग्रॅमर श्री नितीन जोशी प्रस्तविक केले, उपव्यवस्थापक अभियांत्रिकी चे श्री साळुंखे यांनी अहवाल वाचन केले. भारतीय कपास निगम लि चे उप महाप्रबंधक श्री स्वप्नील दडमल, आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की गेल्या 67 वर्षांपासून हे वखार महामंडळ सातत्याने नफ्यात आहे यामागे त्यांचे कर्मचाऱ्यांचे परिश्रम व कामातील सातत्य आहे.तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून नेहेमीच महामंडळ अग्रेसर राहिले आहे. वखार महामंडळाचा प्रगतीचा आलेख असाच कायम चढता राहावा यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वखार महामंडळ चे विभागीय व्यवस्थापक श्री थोपटे यांनी महामंडळाची कार्यपद्धती , कार्य, सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती देताना समृद्धी महामार्गालागत महामंडळाने जांबरगाव, ता. वैजापूर येथे महत्वाकांक्षी असा ऍग्रो लॉजीस्टिक पार्क प्रकल्प उभारण्यात आला असून 10000 मे .टनाचे सायलो उभारले असून साठवणुकीस तयार असल्याचे सांगितले आणि तेथे पेट्रोल पंप, वजन काटा, लॅबोरेटरी, 2 गोदामे इ. वापरासाठी तयार असल्याचे सांगितले
संगणक प्रोग्रॅमर श्री नितिन जोशी, यांनी महामंडळात 2012 पासून सॅप संगणक प्रणाली वापरण्यात येत असून त्या द्वारे ई-वखारपावती देण्यात येत असून ब्लॉक चेन तंत्रज्ञान अंतर्गत MSC बँकेकडून शेतकरी ठेवीदारास तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याची महत्वाची दिली. सदर कार्यक्रमास वखार महामंडळ छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व केंद्रप्रमुख व इतर कर्मचारी वर्ग व सन्माननीय ठेवीदार उपस्थित होते . उपरोक्त कार्यक्रमास उत्कृष्ट ठेवीदार व उत्कृष्ट वखार केंद्र यांना स्मृतीचिन्ह व दहावी व बारावीतील गुणवंत पाल्य यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
माजलगाव वखार केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. राजदीप दौंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर परतूर वखार केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पोतदार यांनी आभार मानले.
यावर्षी निसर्गाच्या कृपेने कापसाचे मोठ्या प्रमाणात पीक येण्याची शक्यता असून आम्ही नेहेमी प्रमाणेच कापूस गाठी साठवणुकी साठी वखार महामंडळाच्या गोदामांनाच प्राधान्य देणार -श्री स्वप्निल दडमल(उप महाप्रबंधक,भारतीय कपास निगम लि)
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.