ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हिंदु

नेवासा – बांगलादेश मध्ये गृहयुद्ध पेटले असून कट्टरवादी मुस्लिम संघटना बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवरती अत्याचार करत आहेत याविषयी भारत सरकारने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपचे नेते मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपला शेजारी देश बांगलादेश येथे राजकीय उलथापालथीमुळे अराजकता माजली आहे कट्टरवादी मुस्लिम संघटनांच्या हाती हा देश गेला आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेला हिंदू समाज धोक्यात आला आहे तेथील हिंदू समाजावर होत असलेले अनन्वित अत्याचार, हिंदु व्यापाऱ्यांच्या दुकांनांची लुट, महिलांवरील अत्याचार,

हिंदु

लहान बालकांचा छळ यासोबतच हे कट्टरवादी मुस्लिम हे हिंदु लोकांच्या हत्या करत मंदिरांना आग लावत आहेत हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपुर्ण भारत देश बघत आहे त्यामुळे तेथील हिंदूंसाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्वत्र होत आहे तरी आपण या जनभावनेचा विचार करून बांगलादेश मधील हिंदूंच्या रक्षणासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी भाजपा कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक ननवरे, योगेश शिरसाट, एकांत तुपे, महेश शिरसाठ, सोहन गीते,निलेश शेंडे, बापुसाहेब शिरसाट, महेश पारखे, श्रीकांत पारखे, आदिनाथ पठारे, कृष्णा भणगे, सोमनाथ शिरसाट, निलेश गायकवाड उपस्थित होते.

newasa news online
हिंदु

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हिंदु
हिंदु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हिंदु