नेवासा – तालुक्यातील सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुजोरी नेहमीच बघावयास मिळत आहे .
आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळचे दहा वाजले तरी येथे नेमणुकीस तीन डॉक्टर असूनही एकही डॉक्टरचा आरोग्य केंद्रात तपास नसल्याचे चित्र दिसून येत आहे . असले प्रकार वारंवार घडत असून रुग्ण डॉक्टर येण्याची वाट पाहत बसतात त्यातच डॉक्टर आले तरी औषधाचा तुटवडा, ही नेहमीचीच बाब झाली आहे .
पत्रकार संभाजी शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता डॉक्टर साधा फोन घेण्याची ही तसदी घेत नसल्याचे समोर आले आहे . शेवटी शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्याशी संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील या प्रकाराबद्दल माहिती दिली व झालेल्या प्रकाराचे चित्रीकरण करून त्यांना पाठविले . औषधोपचार तर दूरचीच गोष्ट परंतु साध रुग्णांची बोलण्याच तारतम्य येथील डॉक्टरांना दिसून येत नाही . या आरोग्य केंद्रामध्ये औषधाचा नेहमीच तुटवडा असतो त्याचबरोबर डॉक्टरांची अनुपस्थिती हे जणू सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आभूषणच झालेल आहे .
जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीच्या अभावी प्रशासक राजा असून याचाच फायदा डॉक्टर घेत असुन सर्वसामान्य नागरिकांशी गैरवर्तन करतानाचे चित्र दिसून येत आहे.
या गोष्टीला आळा बसणार का हा प्रश्न आता ऐरणीवर वर आला आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करून त्यांची तातडीने बदली करून नागरिकांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या .
सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक साथीच्या आजाराने थैमान घातलेले असून याकडे वैद्यकीय अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होताना चित्र दिसून येत आहे .
आपल्या मनमानी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची खेळण्याचा हा प्रकार असून याआधी सुद्धा याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते येथील अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सोनई करांनी केली होती येथे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही दर महिन्याला येथे औषधाचा तुटवडा तुटवडा कशामुळे निर्माण होत आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे जिल्हा प्रशासनाकडून या आरोग्य केंद्राला कमी औषधाचा पुरवठा केला जातो की काय असा प्रश्न :यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे साथीचे आजार डोकं वर काढत असताना वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.