ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

नेवासा – संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत समाविष्ट करण्याची मागणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांनी केली आहे. या मागणीसाठी दि. ८ ऑगस्टपासून सर्व ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

गटविकास अधिकारी डॉ. संजय लखवाल व विस्तार अधिकारी सुवर्णा लेंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या डिजिटलायझेशनच्या धोरणाला अनुसरून महाराष्ट्र सरकारने २०११ मध्ये ई-पंचायत प्रणाली सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सरकारी योजना व विविध सेवांचा लाभ हा थेट संगणकाद्वारे देण्याची योजना आखली. त्यासाठी राज्य सरकारने सीएससी एसपीव्ही या संस्थेच्या माध्यमातून तब्बल २० हजार युवकांना संगणक परिचालक म्हणून कंत्राटी तत्वावर नियुक्त केले होते. मात्र, सीएससी-एसपीव्हीचे कंत्राट ३० जून रोजी संपुष्टात आली असून २० हजार संगणक परिचालकांची सेवाही १ जुलैपासून संपुष्टात आली आहे. तर अद्यापही सीएससी-एसपीव्हीच्या जागी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि नवीन संस्थेकडे कंत्राट गेल्यास संगणक परिचालक म्हणून नियुक्ती होईल का? याबाबत त्यांना साशंकता आहे.

नवीन खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न करता संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून सेवेत समाविष्ट करण्याची मागणी संगणक परिचालकांनी केली आहे. या मागणीसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येत आहे, तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने दिला आहे. संगणक परिचालकांना गेल्या १२ वर्षांपासून ६ हजार ९३० रुपये एवढेच मानधन होते. हे मानधन ३ हजार रुपयांनी वाढवण्याचे आश्वासन होते.

आंदोलन

मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नाही. तसेच, वाढीव ३ हजार रुपये रक्कम ही शासनाच्या निधीतून देण्याची अपेक्षा आहे, मात्र ही वाढीव रक्कम ग्रामपंचायतीच्याच निधीतून देण्याचे नियोजित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर अधिकचा आर्थिक भार आहे. त्यामुळे वाढीव रक्कम ही शासनाच्या निधीतून देण्यात यावी, आणि संगणक परिचालकांना ग्रामपंचायतींच्या सेवेत कायमस्वरूपी तत्वावर समाविष्ट करून घ्यावे. आपले सरकार सेवा केंद्र या नावाने ही प्रणाली ओळखली जाते. आमचे आंदोलन हे सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे, अशी माहिती नेवासा तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बहिरट यांनी दिली.

यावेळी तालुका व्यवस्थापक गोरक्ष डोहाळे, तालुका अध्यक्ष प्रशांत बहिरट, नवनाथ आदमने, सचिव योगेश दाभाडे, गणेश गायकवाड, विशाल क्षीरसागर, किशोर झेंडे, बापू शेलार, सुनील वाबळे, गणेश शेटे, विशाल बर्डे, मनोज जिरे, जयश्री औटी, जयश्री लोळगे, रीना शिरसाठ, प्रीती शिरसाठ, प्रियंका कुटे व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

आंदोलन
newasa news online
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन