नेवासा : नेवासा शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थ हैराण झालेले आहेत भाजीपाला विक्रेत्यांनाही याचा प्रचंड ञास होत होता याबाबत नगरपंचायतीने मोकाट जनावरांच्या मालकांसाठी सुचना देवूनही रस्त्यावर मोकाट जनावरे येतच असल्यामुळे मोकाट जनावरे पकडून संगमनेर गोशाळेत संगोपनासाठी रवानगी करण्यात आली असून सदर कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी सोनाली मात्रे, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के यांनी सांगितले.
नेवासा शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा मोठा ञास ग्रामस्थांना होत होता त्यामुळे संबंधित मालकांना माध्यमांव्दारे सुचनाही देण्यात आलेली होती तरीही मोकाट जनावरांच्या मालकांनी याची खबरदारी घेतली गेली नसल्यामुळे नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के,योगश सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावर मोकाट फिरणारे जनावरे पथकाने पकडून गोशाळेकडे संगोपण करण्याकामी देण्यात आलेले आहे.तसेच यापुढे नेवासा शहरात मोकाट फिरणारे जनावरांवर या प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे.तरी सर्वानी यांची नोंद घ्यावी असे आवाहनही नगरपंचायत कार्यालयाकडून करण्यात आले आहे.सदर कारवाई नगरपंचायत कर्मचारी योगेश गवळी,अरुण चव्हाण,सागर गाडे ,जमीर देशमुख, दौलत चक्रणारायन, अजय चक्रणारायन, रोहित चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.