नेवासा – नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरासमोर आळंदी येथील हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित नेवासा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज शिंदे हे सद्या अहिल्यानगर येथे ऑफलाईन व ऑनलाईन भजन,गीता विष्णू सहस्त्रनाम,पंचीकरण यांचे अतिशय छान पाठ घेऊन चांगल्या पध्दतीने शिक्षण देतात त्यांचा ऑनलाईन प्रबोधन उपक्रम कोरोनाच्या काळापासून सुरू आहे,गेल्या अनेक वर्षांपासून ते नगर येथे वरील अध्यात्मिक शिक्षण आपल्या साधकाला देतात यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे,पुरुषांसाठी ही वेगळे क्लास घेतले जातात, भजन सोडून इतर क्लास चे ते फी घेत नाही अशी माहिती परिचय देतांना अँड.अलकाताई जंगले यांनी यावेळी बोलतांना दिली.
पारायण सोहळयास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे मार्गदर्शक वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के, संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी भेट देऊन ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.ज्ञानेश्वरी पारायणाच्या सांगता प्रसंगी दीप ओव्यांचे वाचन तसेच पैस खांबासह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर संपन्न झालेल्या पारायण सांगता प्रसंगी नगर येथील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.