तहसील ने तातडीने कारवाई न केल्यास आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाचा रस्ता रोकोचा इशारा
बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जवळपास १५० कुपन गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईनच्या प्रतीक्षेत असून हे कुटुंब मोफत धान्यापासून वंचित आहेत नेवासा धान्य पुरवठा अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याशी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून देखील तहसील कार्यालयाकडून कुठलीही कारवाई होत नसून अजून किती दिवस हे कुटुंब मोफत च्या धान्यापासून वंचित राहणार ही मोठी शरमेची बाब आहे पाच ते सहा दिवसात जर हे १५० कुपन ऑनलाइन होऊन यांना धान्य मिळाले नाही तर आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ यांच्या वतीने बेलपिंपळगाव फाटा येथे रस्ता रोको करण्यात येईल तसेच नेवासा तहसील कार्यालय येथे देखील आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यामुळे तातडीने या सर्व वंचित लोकांना न्याय मिळावा अशी मागणी गावातून होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.