श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आदर्शगाव मोरयाचिंचोरेला भेट..
नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ४१५ विद्यार्थ्यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या नेवासा तालुक्यातील आदर्शगाव मोरयाचिंचोरेला भेट दिली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षातील ३६५ दिवस झाडे लावणाऱ्या व झाडांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावाला भेट देऊन व गावातील वृक्षसंवर्धनाची, जलसंधारणाची कामे पाहून विद्यार्थी प्रभावित झाले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख व उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून मोरयाचिंचोरे गावात विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. यातून मोरयाचिंचोरे गावाची आदर्शगाव अशी ओळख झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक बाबासाहेब दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरयाचिंचोरे येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शाळा स्वामी विवेकानंद विद्यालयास व परिसरास भेट दिली. नंतर विद्यार्थ्यांनी जंगल भ्रमंती व गिर्यारोहणाचा आनंद घेतला. निसर्गाच्या सानिध्यात स्नेहभोजन केले. ढगाळ वातावरण, हलकासा पाऊस, डोंगररांगा व हिरवाईने नटलेला परिसर पाहून विद्यार्थी प्रचंड उत्साहित होते. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व कळावे, निसर्गामध्ये जावून निसर्ग समजून घेता यावा, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व कळावे म्हणून या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाता यावे विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आलेले आदर्शग्राम मोरयाचिंचोरे येथे स्नेह भेट उपक्रम राबवण्यात आला याचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग होणार आहे
– उदयन गडाख, उपाध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.