नेवासा – आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून वरखेड, रामडोह, चिखली, खामगाव मध्ये झालेल्या सभा मंडपामुळे वारकरी सुखावले आहे. त्यात विविध धार्मिक कार्यक्रम होण्यास मदत होणार आहे.
आमदार शंकरराव गडाख यांनी नुकत्याच सुरेगाव दही, वरखेड, चिकली खामगाव, रामडोह गावात घोंगडी बैठका घेतल्या. त्याला जनतेतून मोठा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी गावगावात फटाके फोडून आ. गडाख यांचे स्वागत केले जात आहे.
या सर्व ठिकाणी सभा मंडपाची खूप गरज होती. याबाबत ग्रामस्थांनी आ. गडाख यांच्याकडे मागील वर्षी मागणी केली होती. गेल्या २ महिन्यापासून आ. गडाख यांनी तालुका पिंजून काढला आहे.पाहिल्या टप्यात सर्व गावचा दौरा पूर्ण झाल्यावर मागील आठवड्यापासून दुसऱ्या दौऱ्याला त्यांनी सुरूवात केली आहे.
याप्रसंगी पुरुषोत्तम सर्जे, नानाभाऊ नवथर, खरे, कापुरचंद कर्डीले, गणेश ढोकणे, विनोद ढोकणे, गोरक्षनाथ बर्गे, आबासाहेब टाकटे, श्रीरंग हारदे, अशोकराव हारदे, बंडू हारदे, ज्ञाना बोरुडे, बन्सी आगळे, राजू घुले, अरुण रासने, बंडू काळे, पोलीस पाटील काळे, भगवान आगळे, किरण ढोकणे, रेवन साबळे, सुभाष आगळे, धर्मराज घुले, दिलीपराव खैरे, सोन्याबापू गणगे, संपत गणगे, शेषराव गणगे, राहुल गणगे, नारायण गणगे उपस्थित होते.
मंत्रिपदाच्या काळात आमदार गडाख यांच्या १०० कोटींच्या रस्त्याच्या कामाला सरकारने स्थगिती दिली. परंतु ज्या-ज्या वेळेस धरणात पाणी कमी होते. त्या-त्या वेळेस आमदारांनी आंदोलनाचा दणका देऊन पाणी तालुक्यासाठी आणले आहे. याची चुणूक सर्वांनी पाहिली आहे. पाण्यासाठी आमचा फक्त गडाख यांच्यावर भरवसा आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण तात्या कराडे यांनी दिली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.