नेवासा – तालुक्यातील गावामध्ये आता डेंगूसदृश्य हिवताप अंग दुखणे ,डोके दुखणे इत्यादी सारखे अनेक आजार पसरलेले आहेतत्यामुळे नागरिकांची ,मजुरांची आरोग्य धोक्यात आलेली आहे सदर आरोग्य सुधारण्यासाठी व हिवताप निर्मूलनासाठी डास निर्मूलनाची प्रतिबंधात्मक उपाय आयोजित करणे अगत्याचे आहे नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतकडे फॉगिंग मशीन यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे परंतु सदर मशीन नादुरुस्त अवस्थेत दिसून येत आहेत.
यावर्षी पडलेल्या सततच्या पावसामुळे व कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चिखल व डबके तयार झालेली आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सदर डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीन फवारणी करणे गरजेचे आहे त्यासाठी नेवासा तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी व पंचायत समितीने ग्रामपंचायत मार्फत त्वरित फवारणी करावी अशी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ शिंदे सुरेगावकर यांनी मागणी केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.