ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भंडारा

नेवासा – नेवासा येथे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या श्रावणी गाव भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या निमित्ताने पुरातन लाल मोड टेकडीवरच्या मारुतीरायाला अभिषेक घालून झेंडा लावण्यात आला.यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पाकशाळेत झालेल्या सामूहिक श्रावणी भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतहजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

भंडारा

श्रावणी भंडारा कार्यक्रमाच्या निमित्ताने नेवासा येथील श्री खोलेश्वर गणेश मंदिरापासून झेंडा मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीचे नेतृत्व भंडारा कार्यक्रमाचे संयोजक शिवा राजगिरे,अनिल सोनवणे . संतोष भागवत,बंडू अलवणे,मिलिंद नागे यांनी केले.सदरची मिरवणूक मुख्य पेठेतून ग्रामदैवत श्री मोहिनीराजास ग्रामप्रदक्षिणा घालत लोखंडे गल्ली मार्गे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ असलेल्या लालमोड टेकडीवरील मारुती येथे गेली तेथे झेंडा लावून व भंडाऱ्यातील तयार केलेला दाळ बट्टीचा प्रसाद मारुतीराया सह गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित भाविकांच्या समवेत आरती करण्यात आली.बजरंग बली की जय,जय श्रीराम असा जयघोष करत घंटानाद करण्यात आला.

भंडारा

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पाकशाळेत महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम झाला यावेळी नेवासा शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावत परंपरेने श्रावणातील भंडारा कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.सदरचा भंडारा कार्यक्रम लोक वर्गणीद्वारे केला जातो,परंपरा कायम सुरू ठेवल्याबद्दल उपस्थित भाविकांनी संयोजकांना धन्यवाद दिले.

newasa news online
भंडारा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भंडारा
भंडारा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भंडारा