ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हनुमान

बेलपिंपळगाव – अहमदनगर जिल्ह्यातील जागृत देवस्थान बेलपिंपळगाव येथील श्री रोकडोबा हनुमान यात्रा उत्सव संपूर्ण श्रावण महिन्यात साजरा करण्यात येतो महिनाभर या ठिकाणी २४ तास जवळपास पाचशे ते साडेपाचशे नंदादीप अविरतपणे सुरू असतात महिनाभर गावातील शेकडो तरुण घोगरगाव येथून गोदावरी नदीचे पवित्र गंगाजल आणि मूर्ती रोज स्नान घालतात तसेच गावातील शेकडो तरुण श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पवित्र गंगाजल घेऊन येतात तसेच अनेक भाविक श्री क्षेत्र काशी येथून देखील गंगाजल आणून मूर्तीस अभिषेक करतात संपूर्ण श्रावण महिनाभर गावात मोठी चैतन्याचे वातावरण असते श्रावण महिन्याच्या शेवटी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी श्री रोकडोबा हनुमानाची मोठी भव्य दिव्य यात्रा भरत असते.

हनुमान

यावेळी सकाळी विधिवत पूजन करून यात्रेस सुरुवात होते संपूर्ण दिवसभर या ठिकाणी शेकडो टन गुळ व पेढे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते गेल्या अनेक वर्षापासून नवसाला पावणारा रोकडोबा हनुमान येथे नवसपूर्ती म्हणून हा प्रसाद वाटप करण्यात येतो सायंकाळी मानाची मिरवणूक निघत असते यावेळी गावातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील लाखो भाविक दिवसभर दर्शनासाठी असतात व मिरवणुकीत हजर असतात सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजीचा कार्यक्रम असतो
गेल्या अनेक वर्षापासून नवसाला पावणारे या श्री रोकडोबा हनुमानाची यात्रा संपूर्ण महिनाभर गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तरीदेखील सप्टेंबर महिन्यातील तीन तारखेला ही यात्रा भरणारा असून या यात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे अहवान श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट बेलपिंपळगाव तसेच समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

हनुमान
हनुमान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हनुमान
हनुमान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हनुमान