नेवासा – दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजून जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करणेबाबत सकल मुस्लिम समाजाने निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामगिरी गुरू नारायण महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लीम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलीन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे.
भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लीमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणुन काम केले आहे. त्यांनी इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिवाय काहीही आढळुन न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडुन दिला आहे. मोहम्मंद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबते विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजुन काय सांगायचे ? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लीम धर्मियांबाबत मोठया प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरू नारायण गिरी महाराज, सरला बेट ता. वैजापुर, जि. औरंगाबाद यांनी केली आहेत, या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदु-मुस्लीम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला जात आहे.यावेळी जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांना सकल मुस्लिम समाजाची अटक करण्याची मागणी केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.