नेवासा – दुसऱ्या श्रावणी शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील रत्नपूर भद्रा मारुती येथे महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती “बजरंग बली की जय”पवनपुत्र हनुमान की जय”जय श्रीराम” च्या गजराने परिसर दुमदुमला होता. श्रावणी शनिवार च्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास जागृत असलेल्या भद्रा मारुतीरायाला गुजराती काठेवाडी पुष्पांची सजावट करण्यात आली होती.यावेळी पहाटेच्या सुमारास भद्रा मारुती हनुमंतरायास वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य बंडू गुरू,बाळू गुरू,बबन सोनवणे, ज्ञानेश्वर नागे,आकाश जाधव,कस्तुरे गुरू यांनी केले.
यावेळी माजी खासदार व भद्रा मारुती संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत खैरे,संस्थानचे सचिव मंत्री अतुल सावे,अध्यक्ष मिठूभाऊ बारगळ, उपाध्यक्ष रामनाथ बारगळ,कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष पोपट जैन,विश्वस्त कचरू पाटील बारगळ,भूषण अग्रवाल, खंडेराव बारगळ,संस्थानचे सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते. दुसऱ्या श्रावणी शनिवार च्या निमित्ताने मध्यरात्री रात्री १२ वाजता वेदमंत्राच्या जयघोषात शंख नाद करून अभिषेक घालण्यात येऊन दर्शन सुरू करण्यात आले. भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सेवा,रुग्णवाहिका सेवा पिण्याचे स्वच्छ पाणी व्यवस्था भद्रा मारुती मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर प्रांगण भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.पहाटे पावसाची रिपरिप असून देखील भाविक दर्शनासाठी येत होते.
यावेळी आलेल्या सर्व भाविकांचे भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी स्वागत केले. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून पोलीस स्टेशन, होमगार्ड पोलीस मित्र संघटनेच्या कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट सेवा देण्यात आली.प्रभू रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की च्या गजराने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय बनले होते.श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी सुमारे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या दृष्टीने आम्ही सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.