नेवासा – नेवासा बुद्रुक येथील शिवांश एंटरप्राइजेसचे मुख्य चालक व युवा उद्योजक अजय दादासाहेब डौले यांची शिवसेना (शिंदे गट)पुरस्कृत असलेल्या युवा सेनेच्या नेवासा तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख शुभम सुरेश वाघ यांनी अजय डौले यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.नेवासा तालुक्यात शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून युवा शक्तीला संघटित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी आपला प्रयत्न रहाणार असल्याचे युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय डौले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
शिवसेना पक्षाच्या युवा सेना तालुका प्रमुख पदी युवा उद्योजक म्हणून नावलौकिक असलेले अजय दादासाहेब डौले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेनेचे नेवासा विधानसभा निरीक्षक जेरी डेव्हिड व माजी खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा प्रमुख नितीन औताडे यांच्या हस्ते जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा उपाध्यक्ष भगवान गंगावणे,विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ, जेष्ठ विधी तज्ञ अँड.के.एच.वाखुरे,युवा सेनेचे शुभम उगले,तालुका प्रमुख सुरेश डीके,शहर प्रमुख बाबा कांगुणे,बंडू शिंदे,बापूसाहेब दारकुंडे, अंबादास रोडे यांनी अजय डौले यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.