नेवासा – एका व्यक्तीने दोन रुग्णालयांत उपचारासाठी अॅडमिट झाल्याचे खोटे कागदपत्र तयार करून आरोग्य विम्याचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २ ते १० जुलै २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुधीर पद्मनाथ झिने (रा. हिंगोणी, ता. नेवासा), वडाळा येथील फेअर बँक जेम्स फ्रेंडशिप मेमोरियल हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ युनियं एफआयएफएम हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी लॅबमधील डॉक्टर व डायग्नॉसिस सेंटरमधील कर्मचारी, शेवगाव येथील जीवन ज्योत हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमधील डॉक्टर व
डायग्नोसिस सेंटरमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत इंश्युरन्स कंपनीचे प्रतिनिधी संतोष औडाजी साठे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीने २ जुलै रोजी वडाळा (ता. नेवासा) येथील फेअर बँक जेम्स फ्रेंडशिप मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तसेच शेवगाव येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये एकाच आजारासाठी दाखल झाल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही बाब इंश्युरन्स कंपनीच्या निदर्शनास आली. खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याने कंपनीने आरोपी व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.