ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अपघात

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे ट्रकच्या अपघातात महिला ठार तर पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे.दि. १८ रोजी रविवार हा सोनई बाजार दिवस असतो आपला नेहमी प्रमाणे बाजार उरकून सासरा राधाकिसन सोन्याबापु पालवे व सुन शिला बाळासाहेब पालवे हे घरच्या दिशेने निघाले होते. गावाच्या अगदी जवळ आल्यावर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक ने समोरुन जोरदार धडक दिली त्यामध्ये महिला शिला बाळासाहेब पालवे या जागेवरच मयत झाल्या तर सासरे हे गंभीररीत्या जखमी झाले .

त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या संसारासाठी आणलेला बाजार सगळा रस्त्यांवर विखुरला होता धडक दिल्या नंतर अपघातग्रस्त ट्रक चालक त्या ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने जात असताना गावातील काही तरुण व पोलीस यांनी सोनई जवळ त्यास ताब्यात घेतले. सोनई पोलीस ठाण्याचे पि. एस. आय. सुरज मेढे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत घटना स्थळी दाखल होत पुढील सोपस्कार पार पाडले.

अपघात
अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात