घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव निमित्ताने मंगळवार 20 ऑगस्ट ते मंगळवार 27 ऑगस्ट दरम्यान श्रीकृष्ण लीलामृत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 20 ऑगस्ट रोजी सायं.5 वाज. ह भ प सुनीलगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम होऊन या कथेस प्रारंभ होईल.
जोशी समाज युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ घोडेगाव यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव निमित्ताने सायं 7 ते 9 यावेळेत ह भ प कथाचार्य वैभवी श्री जी यांच्या अमृतवाणीतून श्रीकृष्ण लीलामृत या कथेचा प्रारंभ होणार आहे
यामधे यदुवंश वर्णन,कृष्ण जन्मोत्सव,पुतनावध,बाललीला, माखनचोर,गोवर्धन,रासलीला,रुक्मिणी श्रीकृष्ण विवाह,सुदामाचरित्र,ब्रज द्वारका मिलन असे कार्यक्रम उपस्थितांना श्रवण करण्यास मिळतील तसेच रोज कथा संपन्न झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे तसेच हभप कीर्तन केसरी संतोष महाराज वणवे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे कथेची सांगता होणार असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन जोशी समाज युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ घोडेगाव यांच्यावतीने करण्यात आलेले आहे
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.