नेवासा – तालुक्यातील विविध योजना राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतने रक्षाबंधन निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोनातील विधवा महिलांना एक हजार रुपये देण्याचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी ठरविले होते त्याप्रमाणे आज रक्षाबंधन निमित्ताने दिल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
मागील दोन वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोना विधवांना दिवाळीनंतर भाऊबीज साठी एक हजार रुपये सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येत आहेत यावर्षी रक्षाबंधन साठी एक हजार रुपये व भाऊबीज निमित्त दोन्ही सणानिमित्त एक हजार रुपये असे एका वर्षात दोन हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे.
सदरची रक्कम ग्रामनिधी मधून देण्यात येणार आहे
रक्षाबंधन निमित्त सौदाळा ग्रामपंचायत विधवांचा भाऊ झाली असून यापुढे विद्वान साठी नवीन योजना आणणार असल्याचे बोलले जाते
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सौंदाळा ग्रामपंचायतच्या या योजनेची परिसरातून कौतुक होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.